चित्रा न्युज ब्युरो
वाशिम:- जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी बहरलेली असताना गेल्या काही दिवसापासून यामध्ये अधिकच भर पडत असल्याचे स्पस्ट होत आहे. काल दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील अग्रगण्य असलेले पुरवश्रित भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष युसूफ शेठ पुंजानी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे यांची भेट घेऊन यापुढे आपण वंचित बहुजन आघाडी सोबत काम करणार असल्याचे स्पस्ट केले. मो. युसूफ पुंजानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करण्याचा मानस बोलून दाखविला.
0 टिप्पण्या