Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल मंजूर होऊन बांधायला निधी मिळाला नाही,पहिला हप्ता मिळाला आठ महिने झाले दुसर्याचा पत्ता नाही,, विजय चौडेकर, सामाजिक कार्यकर्ता,,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,

नांदेड -पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल ग्रामीण भागात मंजुरी झाले, हक्काचे घर मिळणार ही आशा पल्लवित झाली पहिला हप्ता आला ते पण तूटपुंजा गरीब जनतेनी उधार उसनवारी करून घर बांधायला सुरुवात केली खालच बेसमेट करून फोटो पुरावा म्हणून पाठवला दुसरा हप्ता लवकर मिळेल ह्या आशेने आठ महिने झाले तरी यायचा पत्ता नाही इंजिनिअर येवून तपासणी करणार मगच दुसरा चेक निघणार आणि इथेच भ्रष्टाचारास सुरुवात झाली ज्यांनी इंजिनिअर चा खिसा भरवला त्यांचे काम फटाफट झाले आणि जे वाट पाहत राहिले हे की आता येईल तवा येईल ते गरीब दिव्यांग प्रतिक्षा करत बसले तहशील कार्यालयात जायचे तेथील अधिकार्यास विचार पुस करायची खेटे घालत बसायचे आठ महिन्यांपासून हेच चालू आहे, घरकुल मंजूर होण्यासाठी कित्येक वर्षे गेली मंजूर झाले तर वर्षाला एक चेक येत आहे,, बांधकाम कसे करणार गरीब, विधवा, दिव्यांग,हे कोणाला कळणार आणि दुसरी बाब ज्यांनी आधी च घर बांधून घेतले दोन मजली का असेना त्यांना पैसे मिळुनही गेले,पाच, हजार दहा हजार रुपये दिले काम झाले,असा गरिब, दिव्यांग, विधवा नागरिकांवर अन्याय होत आहे कारण ते चिरीमिरी देऊ शकत नाहीत प्रश्न हा आहे, सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर, अधिकारी वर्गाशी संवाद साधला ते सांगतात,रमाई घरकुल चे काम आणखी संपले नाही, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे कुठून मिळतील दुसरा चेक वर्षाने येईल कि दिड वर्षाने येईल आम्हाला माहीत नाही,याची चौकशी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेबांनी करावी आणि घरकुल साठी पहिला हप्ता येऊन दूसरा चेक येण्यासाठी आठ महिने खरच लागत आहेत का,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या