Ticker

6/recent/ticker-posts

मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा

पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग

अमळनेर :-अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे मतदान जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
      विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.या अंतर्गत जी.एस.हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाने,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस.सोनजे,कलाशिक्षक के.व्ही. पाठक तसेच शिक्षक व शिक्षतेकर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या