चित्रा न्युज ब्युरो
वर्धा : केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत येणा- रॅम प्रोजेक्टच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत आयआयएम नागपूर इन्फेड, लघु उद्योग भरती वर्धा आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी क्षमता बांधीण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन स्पेडवूडचे को-फाऊंडर आणि संचालक विवेक देशपांडे, कॉर्पोरेट वकील डॉ. शंतनु जोग, आयआयएमचे सहाय्यक प्राद्यापक डॉ. निलकंठ ढोणे उपस्थित होते तर लघु उद्योग भरतीचे महाराष्ट्राचे सहसचिव हरीष हांडे, वर्धा चे अध्यक्ष जगदीश पटेल जिल्हा इंडस्ट्रियालिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष प्रविण हिवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे तुषार आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विवेक देशापांडे यांनी उद्योगाचे सुक्ष्म आणि कार्यक्षम व्यवस्थापन कसे करावे याबाबत तर डॉ. शंतनु जोग यांनी उद्योगांसाठी बौध्दीक मालकी हक्क असणे किती आणि कसे गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. निलकंठ ढोणे यांनी उद्योगांचे कार्यक्षम व्यवस्थाप कसे करावे यावर विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रुपसिंग ठाकूर, विकास समन्वयक धीरज मनवर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्फेडचे अमोघ तिजारे व आयबीएफसी वर्धा चे केंद्र समन्वयक रुपेश रामगडे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगावर व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.
0 टिप्पण्या