Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय कम्युनिष्ठ पक्षाची शतकाकडे वाटचाल

पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक

अमळनेर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणुन ९९ वर्षे पूर्ण केले असुन १००राव्या वर्षात पदार्पण करीत आहे.अमळनेर तालुक्यातील  कार्यकर्त्यांनी उत्साहात वर्धापन दिवस साजरा केला.
   कार्यक्रमात पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते काम्रेड लक्ष्मण शिंदे यांनी प्रास्ताविक भाषण केले , कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉम्रेड शिवाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेंच कार्यक्रमाचे आयोजक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जळगाव जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील यांनी पक्ष स्थापनेपासून चा इतिहास मांडून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चे योगदान  देशासाठी कित्येक कम्युनिस्ट अमर हुतात्मा झाले शहित भगतसिंह, आणि साथीदार, इंग्रजांच्या काळात महान क्रांतीकारक क्रातीसिह नाना पाटील, त्यांच्या तुफान सेनेत मोलाची भुमिका निभावणारे  डांगरीचे डॉक्टर उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील यांनी अमळनेर कोर्ट जाळले इंग्रज राजवटीला हैराण करून सोडले असे महान क्रांतीकारक आपल्या अमळनेर येथे होवुन गेलेत  ,एका पिंजारी समाजाच्या मिल मजदुरास न्याय मिळवून देण्यासाठी  कॉम्रेड श्रीपत पाटील आणि त्यांचे आठ साथी असे कामगार नेते जिवाची बाजी लाऊन जालीम सरकारच्या जुलमाचे शिकार झाले .
असा क्रांतीकारक पक्ष  कार्येकर्ते कष्टकरी, कामगार, किसान यांच्या उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस  मेहनत करीत आहेत असा क्रांतीकारक पक्ष आपल्या सर्वसामान्य, सर्वहरा जनतेसाठी सदैव लढत असतो.पक्षाचे ध्येय, धोरण हे सर्व सामान्य नागरिकांना योग्य न्याय मिळवून देणे हाच असून जनतेने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  सभासद होवुन आपल्या हक्काच्या लढाईसाठी पक्षात सामिल व्हावे असे आव्हान जिल्हा सेक्रेटरी यांनी केले, पक्षाचे झेंडागीत होवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या