चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महा विद्यालया तील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वार्षिक विशेष युवक शिबिर दत्ता गाव भिला नाईक तांडा येथे दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 दरम्यान "युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी" या संकल्पनेवर आधारित संपन्न होणार आहे.
मनुष्यबळ मंत्रालय ( नवी दिल्ली )तंत्र शिक्षण मंत्रालय (महाराष्ट्र राज्य) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे राष्ट्रीय सेवा योजना विभागव महाविद्यालयाद्वारे आयोजित "युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी" या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम या शिबिरात राबविण्यात येणार आहेत शिबिराचे उद्घाटन दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे शिबिराचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात चे राष्ट्रीय विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांच्या हस्ते होणारा असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के. बेंबरेकर हे राहणार आहेत.
शिबिरासाठी नवीन शैक्षणिक धोरण, बालविवाह जनजागृती, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन, वाचक -लेखक संवाद, ग्रंथ दिंडी, डिजिटलायझेशन व युवक, या विभिन्न विषयावर तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापकाचे व्याख्यान व समाज जनजागृती करण्यासाठी केशव हरी केंद्रे व हिरामण महाराज यांचे समाज कार्यक्रम संपन्न होणार आहेत. डिजिटल सहेली, बचत गट डिजिटलायझेशन, व डिजिटलाजेशन व सायबर , कॅशलेस व्यवहार व युवक, जल व्यवस्थापन व युवक , प्लास्टिक मुक्त भारत व युवक, अशा विभिन्न विषयावर जनजागृती अभियान शिबिरात संपन्न होणार आहे
शिबिराची तयारी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. शेषराव माने प्रा. ज्ञानेश्वर चाटे महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. शुभांगी दिवे डॉ. रत्ना कोमावार मेहनत घेत आहेत.


0 टिप्पण्या