Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा.राजेश्रीताई कदम यांचा सत्कार


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


 धाराशिव :- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते या धम्म सहलीसाठी वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय भंडारे सर बी एस गायकवाड सर वानखेडे सर खोब्रागडे सर यांचे मार्गदर्शन लाभले, दिनांक 16 जानेवारी दिवशी सहलीला सुरुवात झाली एकूण दहा दिवस श्रीलंका येथील सर्व बौद्ध  स्थळांना भेट दिली.या सहलीमध्ये 90 जणांचा सहभाग होता. सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे निवासाची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली होती.
तुळजापूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम यांचा भारतीय बौद्ध महासभा धम्म सहलीसाठी नेत्रुत्व केल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष विजयमाला धावारे मॅडम, भारतीय बौद्ध महासभा धम्म संस्कार विभाग प्रमुख विजय बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशिल कदम,व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, लक्ष्मीताई कदम समता सैनिक दल , आप्पासाहेब डावकरे,करणं डावकरे, अजिंक्य डावकरे, अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कंटू कांबळे, जयश्रीताई डावकरे हेमा ताई कदम कीर्ती ताई गायकवाड शीलाताई कदम पुष्पाताई रणझुंजारे, संगीता ताई कदम प्रणिती ताई कदम सावित्रीताई कदम यांच्यासह नातेवाईक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या