Ticker

6/recent/ticker-posts

मौजे चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७६वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा.


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


 
धाराशिव :-मौजे चिवरी तालुका तुळजापूर येथे ७६वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुभाष हनुमंत चिमणे यांच्या कडून शैक्षणिक शालेय साहित्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर जाहीर कार्यक्रमात वाटत करण्यात आले.यावेळी जाहीर सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष अविनाश जाधव तसेच प्रमुख पाहुणे आर एस गायकवाड
शाळेचे मुख्याध्यापक राहुल मसलेकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुष्का मनशेट्टी मॅडम, अंगणवाडी कार्यकर्ती लक्ष्मी मेंढापुरे व श्रीमती कल्पना शिंदे आशा कार्यकर्ती श्रीमती राजश्री कांबळे गावातील प्रतिष्ठित शालेय शिक्षण समितीचे सदस्य बबन शिंदे दीपक बनसोडे कांचन चिमणे, शितल कांबळे शरद निकाळजे आनंत बनसोडे बाळू चिमणे, राम वाघमारे राम कोरे युवराज साखरे चेंबज साखरे सचिन शिंदे सुकेश झांबरे बालाजी शिंदे सुदर्शन मुळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले.आर.एस. गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरडी मसले यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एस सोनटक्के सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यांनी मांडले या कार्यक्रमासाठी गावातील शिक्षण प्रेमी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या