चित्रा न्युज ब्युरो
भद्रावती :- मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चंदणखेडा येथे दिनांक15-01-25 रोजी पार पडली. उत्पादनाच्या स्पर्धेमध्ये शेतकरी वर्गामध्ये कीटकनाशक फवारणी करण्याची लगबग सुरू असते. यातच कीटकाच्या कोणत्या त्या स्थितीमध्ये व कोणते कीटकनाशक फवारणी करावी. फवारणी करताना कोण कोणतीकाळजी शेतकऱ्यांनी घ्यावी यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून दरवर्षी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत कार्यशाळा घेण्याची निर्देश आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चंदनखेडा येथे श्री आशूतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आकनूरवार सहा गट विकास अधिकारी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री चवले मंडळ कृषी अधिकारी चंदणखेडा होते. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री महेंद्र डाखरे कृषी अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांनी केले. सदर कार्यशाळे अंतर्गत एकर जुना फॉर्म वरोरा येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. आनंद वरघट यांनी कीटकनाशकाची वर्गीकरण कीटकनाशकांची उत्पत्ती किडींची ओळख मित्र किडी व शत्रू किडींची ओळख किडींची आयुष्यमान तसेच कीटकांच्या कोणत्या स्थितीमध्ये कुठल्या कीटकनाशकांची फवारणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचा लाभ चंदनखेडा शिवारातील आसपासच्या शेतकऱ्यांनी तथा कृषी केंद्र संचालकांनी लाभ घेतला. सदर कीटकनाशक फवारणी कार्यशाळेचे जनजागृतीच्या कार्यक्रम चे संचालन श्री खडतकर माही कृषी केंद्र चंदणखेडा तर आभार प्रदर्शन श्री प्रमोद ढोरे विस्तार अधिकारी कृषी यांनी केले.कार्यक्रम यशसवी करनेकारिता चंदणखेडा सर्कल मधील सर्व कृषी सहाय्यक ग्राम पंचायत अधिकारी तथा कृषी केंद्र धारक यांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या