चित्रा न्युज ब्युरो
भद्रावती : संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा सा कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळा आयुध निर्मानी चांदा गेट समोर उभारावा असे निवेदन कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक तथा जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर यांना दिले.
भद्रावती शहरालगत असलेल्या आयुध निर्मानीची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री मा सा
कन्नमवार यांच्या पुढाकाराने झाली त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या अल्पकाळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले त्याचा एक भाग म्हणून या आयुध निर्मानीची स्थापना केल्या गेली अश्या या महान जिल्ह्याच्या सुपुत्राची पुढल्या पिढीला माहिती मिळत राहावी या उद्देशाने त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचेकडे पाठपुरावा करावा असाही उल्लेख निवेदनात केला आहे.


0 टिप्पण्या