Ticker

6/recent/ticker-posts

समाज माध्यमावर डॉ. आंबेडकर आणि मातारमाई यांच्या बद्दल अपमानास्पद व्हिडिओ वायरल !


वंचित बहुजन आघडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !


चित्रा न्युज ब्युरो
नांदेड : समाज माध्यमवावरून नीलिका आंबेडकर या ट्विटर अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या चारित्र्यावर अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलून व्हिडिओ वायरल होत आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर आणि वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र सदस्य अक्षय बनसोडे यांनी नांदेड पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

सदरील व्हिडिओ हा भारतभर प्रसारित झाला असून, सामाजिक भावना दुखावणे, चुकीची माहिती पसरवणे आणि महापुरुषांचा अपमान या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती निवेदनात केली आहे.  तसेच या संबंधित विकृतीला तत्काळ अटक करून शिक्षा करावी अशीही विनंती यामध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाचा भारतभर उद्रेक होऊ शकतो अशी भीती सुद्धा या निवेदनात व्यक्त केली आहे.
-----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या