विधिवत पूजन करून दो दाणी शंकरपटाला सुरुवात
चित्रा न्युज ब्युरो
तळेगाव दशासर :- कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित शंकरपटाचे (बैल जोडी स्पर्धा ) भव्य उदघाट्न बुधवार15 जानेवारी रोजी विदर्भ केसरी मैदानावर करण्यात आले.उदघाट्न प्रसंगी धावण्यात आलेल्या बैल जोडीचे पूजन करण्यात आले.तसेच धुरकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
. दो दाणी स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार अमरभाऊ काळे कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, श्रीकांत गावंडे, आनंद देशमुख, डॉ. सालनकार,नितिन कनोजीया,, सरपंचा मीनाक्षीताई ठाकरे अनिताताई मेश्राम, मोहनभाऊ घुसळीकर,अनंतरावं बगाडे,विनोदराव रामेकर,सुयश भाऊ देशमुख, मोहनभाऊ सिंगवी ठाणेदार रामेश्वर धोंडगे, बंटीभाऊ देशमुख इत्यादी मान्यवरांचे कृषक सुधार मंडळाचे वातिने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आज असलेल्या दो दाणी स्पर्धेत हिरा - देवा, बादल -शहशाह, मल्हार -तुफान, लाल - बादशहा, हिरा -तुफान, शहशाह -गोल्डन, सोमा - शेऱ्या, मारोती - तिरंगा, शिव - शक्ती, शंभु - भवानी, कालिचरण - गोल्डन, रॉकेट - अर्जुन,इत्यादी नावाच्या बैल जोड्या शंकर पटात सहभागी झाल्या.
15 जानेवारी पासुन सुरु होणाऱ्या शंकर पटात 15 जानेवारी रोजी दो दाणी स्पर्धेचे तसेच 16 व 17 जानेवारी रोजी एकदानी शंकर पटाचे व 18 जानेवारी रोजी महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचे आयोजन करन्यात आले आहे. तळेगावात सुरु असलेल्या पटामुळे गावाकरी व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरणात निर्माण झाले आहें
मागच्या वर्षी च्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात बैल जोड्या सहभागी झाल्या.
उद्या पासुन सुरु होणाऱ्या एक दाणी पटा मध्ये सहभागी होण्यासाठी नामवंत जोडया चे आगमन झाले.


0 टिप्पण्या