Ticker

6/recent/ticker-posts

सर्वधर्म समभाव चे प्रतीक निसर्ग रमणीय: बंदरझिरा दर्गा

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-हिंदू  मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेली बंदरझिरा (अंबागड,) येथील सैय्यद सीद्धिक शाह र. अ.यांची दर्गा असून आज २७ जाने. ला उर्स होणार आहे. भंडारा,नागपूर,विदर्भ, म. प्र., छ. ग. इतर ठिकाणाहून भाविक हजेरी लावणार. या क्षेत्राशी परिचित मो सईद भाई शेख यांच्या माहिती प्रमाणे हिंदू_मुस्लिम समाजातील भाविक(जायरीन) येथे उर्स निमित्त एकत्रित होवून जात_पात विसरून संपूर्ण मानव_जातीचे कल्याण,शांती,सद्भाव, अमन साठी प्रार्थना करतात.भंडारा जिल्ह्यात तुमसर पासून १४ की.मी.अंतरावर आंबागड गावा जवळील पर्वताच्या निसर्ग रमणीय परिसरात घनदाट जंगलात ही दर्गा असून ३०० वर्षापासून भाविकांच्या आस्था, व विश्वासाचे प्रतीक आहे.
३०० वर्षापूर्वी इथे अरबस्तान इथून बाबा सिद्दिक शाह व त्यांचे शिष्य बाबा बासगीर या ठिकाणी आले आणि येथील गुहेत बसून. अल्ला ची इबादत(,प्रार्थना) करू लागले.कुठे ही पाण्याचा थांग_पत्ता नव्हता,अनेक नाले,जलाशय, झरे सर्व कोरडे,ठणठणाट .मानव आणि प्राणी जगत ला खूप त्रास होवू लागले.बाबाच्या कृपेने येथे अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले सर्व नद्या, नाले,झरे,जलाशय पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आणि पहाडाच्या पोटातून मोठा  झरा निरंतर वाहू लागला आणि जिकडे_तिकडे सुख_समृद्धी,शांती ची नवीन पहाट उगवली.अंबागड किल्ल्याचे निर्माते राजे बख़्तबुलंद शाह हे किल्ल्यावर मुक्कामास असताना इथे बाबांच्या दर्शनाला यायचे असे जुने लोक सांगतात.
ऊर्स निमित्त गावातून भाविक लोक संदल काढून दर्ग्यावर चादर चढवणार असून ध्वजारोहण, मिलाद,फातेहा,तकरीर,लंगर, (महाप्रसाद) ई चे कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत.या ठिकाणी शांत वातावरणात एक अलौकिक आनंद व शांती , समाधानआणि सकारात्मक ऊर्जा मिळते.स्वच्छ शरीर व मनाने येथे भेट दिल्यास बाबा भाविकांची ईच्छा पुर्ण करतात.दर्गा आणि गावातील चौक,आदिवासी आश्रम शाळा ई ठिकाणी काही सामाजिक संघटना व गाववासिया कडून महाप्रसाद(लंगर) चे आयोजन ही करण्यात आले आहेत.
जवळच अंबागड किल्ला,आणि निसर्ग रमणीय जलाशय असून भाविक व पर्यटकांचे चांगले पर्यटन ही होते,परंतु योग्य रस्ते, पाणी,विश्रामगृह,वीज, ई ची व्यवस्था नसल्याने भाविक व पर्यटक ई ची गैरसोय होते.या स्थळास तीर्थ,पर्यटन यादीत समावेश करण्या करिता ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्था कडून प्रयत्न सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या