Ticker

6/recent/ticker-posts

पतंजली योग समिती भंडारा, संविधान शाखा भंडारा तसेच सहकारी पतसंस्थेचे संघ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-पतंजली योग समिती भंडारा, संविधान शाखा भंडारा तसेच सहकारी पतसंस्थेचे संघ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात अध्यक्ष श्री सदानंदजी  इलमे प्रमुख पाहुणे म्हणून महादेवजी बांगडकर, श्री डॉ.बाळकृष्णजी सार्वे, अतुल वर्मा होते. 
ध्वजारोहण श्री अतुल वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
या शुभप्रसंगी डॉक्टर बाळकृष्णजी सार्वे यांनी संविधानाची उद्देशिका चे वाचन केले तसेच श्री वामनरावजी गोंधुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर गीताचे गायन केले. शेवटी आभार प्रदर्शन आणि व अल्पोपहारणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या