Ticker

6/recent/ticker-posts

रमाई भजन मंडळाच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जाहीर सत्कार,

चित्रा न्युज ब्युरो
 नागपूर :- पोष पोर्णिमा निमित्त, दिनांक-13/01/2025 रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत माननीय प्रीतम मेश्राम यांच्या राहते घरी परितरण पाठाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून, रमाई भजन मंडळ, पवनपुत्र नगर दिघोरी नागपूर, भजनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी रमाई भजन मंडळाच्या गायिका जोशना मेश्राम यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन गीत सादर केले व त्यांच्या शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी गायिका वर्षा शेंडे, गायिका दीक्षा चव्हाण, गायिका ज्योत्स्ना मेश्राम, स्वाती वाघमारे, सपना ढेकले, वंदना महेश कर, गीता गणवीर, अर्चना मोटघरे, रसिका मेश्राम, कार्यक्रमाचे आयोजक प्रीतम मेश्राम, बौद्ध उपासक, उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या