Ticker

6/recent/ticker-posts

निरा उजवा कॅनॉलच्या पाण्यामध्ये आढळून आला पुरुष जातीचा मृतदेह.

चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे भांबूर्डी येथे निरा उजवा कॅनॉलचे पाण्यात दिनांक १०/०१/२०२५ रोजी बेवारस पुरूष जातीचे अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचे प्रेत मयत अवस्थेत मिळून आल्याने त्याबाबत माळशिरस पोलीस स्टेशन मध्ये बेवारस मयत आकस्मित मृत्यू नोंद दाखल करण्यात आली असून त्याची पाहणी करून प्रेताबाबत खात्री करून पोलीस ठाणेस अकस्मात बेवारस मयताबाबत पाण्यात पडून बुडून मयत झाला आहे म्हणून खबर आहे.
तरी सदर बेवारस मयताचे नाव पत्त्याबाबत व त्याचे नातेवाईकांचा शोध होणेकरीता वरील वर्णनाची व्यक्ती बाबत माहिती मिळाल्यास माळशिरस पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या