चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- जय राजाभोज छत्रिय पवार समाज संस्था सालेभाटा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मध्यप्रदेश राज्य मधील झालेल्या चक्रवती राजाभोज यांच्या प्रतिमेच्या अपमान जनक instagram व्हिडिओ बनवल्याबद्दल या निषेधार्थ आज दिनांक:- 20 /02 /2025 ला पोलीस स्टेशन लाखनी तसेच तहसील कार्यालय लाखनी निषेधार्थ निवेदन देण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की, मध्य प्रदेश राज्यांमधील भोपाल येथील भोजजलासयमध्ये राजाभोज यांची भव्य दिव्य प्रतिमा अस्तित्वात आहे.भोपाल मधील एका व्यक्तीने इंस्टाग्राम अकाउंट वर {nawab_e_Bhopal } या अकाउंट वरून पवार समाजाचे आराध्य दैवत राजाभोज यांचे कार्टून व्हिडिओ बनवून दिनांक:- 14/02/ 2025 ला पहिला व्हिडिओ व दिनांक:-17/02/ 2025 ला दुसरा व्हिडिओ इंस्टाग्राम वरून प्रसारित केला आहे हा व्हिडिओ समाजाप्रती अपमान जनक असून समाज समाजामध्ये द्वेष निर्माण करणार आहे समाजाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्यासारखा आहे. त्यामुळे इंस्टाग्राम अकाउंट व्यक्तीवर सायबर सेल गुन्हेगारी विभागामार्फत या इंस्टाग्राम चालवणाऱ्या व्यक्तीवर योग्य कारवाही करून इंस्टाग्राम मधील व्हिडिओ डिलीट करून इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात यावा तसेच त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून योग्य कारवाई करावी, जेणेकरून समाजात समाजात मध्ये देष निर्माण होणार नाही व शांतता व सुरक्षा टिकून राहील अशी आम्ही लाखनी तालुका पवार समाज संघटना लाखनी च्या वतीने निवेदन दिला आहे निवेदन देताना समाजाचे मा.श्री.कैलासजी भगत मा. श्री.शेषरावजी बोपचे मा.श्री. विजय बोपचे ,तुषार रहांगडाले , सुरेंद्र पटले ,संजीव रहांगडाले,संजयजी बोपचे, तेजलाल पटले , ज्ञानेश्वरजी पटले , खुशालजी पटले आधी पवार समाजाचे मान्यवर उपस्थित होते।।
0 टिप्पण्या