Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक कर्करोग दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी        
अमरावती :-जागतिक कर्करोग दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे 4 फेब्रुवारीला कर्करोग दिन साजरा करण्यात आला "एकजूट होऊया कर्करोगाला हरवूया" राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मुख कर्करोग, गर्भाशय कर्करोग आणि स्तनाचे कर्करोग याबाबतीत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार सर यांनी गर्भाशय कॅन्सर, स्तन कॅन्सर, मुख कॅन्सर याबद्दल कार्यक्रमात मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर सचिन कोरडे यांनी कॅन्सर बद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे तसेच योग्य वेळी तपासणी करून घेणे सुद्धा गरजेचे आहे याबद्दल माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका जयश्री मोरे यांनी स्तन कर्करोगाबाबत मार्गदर्शन केले. स्तनामध्ये बदल होणे, स्तनामध्ये गाठ येणे यासारखे जर काही बदल दिसून आले तर स्त्रियांनी योग्य वेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे तसेच  वय 30 पेक्षा जास्त असेल तर गर्भाशयाची व्हीआयए ही चाचणी करून घेणे सुद्धा गरजेचे आहे लोकांमध्ये कॅन्सरबद्दल असलेल्या भ्रमक कल्पना आणि कॅन्सर बरा होऊ शकतो की नाही ही अशी असलेली विचारसरणी यावर मात करण्यासाठी एक्झिट होऊया कर्करोगाला हरवूया या म्हणीप्रमाणेच आपण कर्करोगावर नक्कीच विजय मिळवून हा कार्यक्रम साजरा केलेला आहे यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिसबा सर, डॉक्टर ,आंडे मॅडम, कर्मचारी सुजित वानखडे, शेख युसुफ, कविता इंगोले, आशिष पाटील ,विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, वगारे सिस्टर, श्रीकांत गोहाड, नागोराव खडसे तसेच इतर कर्मचारी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या