Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्याला भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती

चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:- वर्धा जिल्हा विकासासाठी  मागील आर्थिक वर्षापेक्षा सन 2025 -26 यावर्षासाठी भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक आज दुरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे उपस्थित होते.
 मंत्रालय मुंबई येथून ऑनलाईन बैठकीद्वारे वर्धा जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला. जिल्हा विकासासाठी अतिरिक्त निधीसह वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. याचा सकारात्मक विचार करून वाढीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन व जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार उपस्थित होते. 
यावेळी श्री. पवार यांनी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेल्या विकास कामांचा व निधीचाही आढावा घेतला. पुढील आर्थिक वर्षासाठी यंत्रणांनी 209.36 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक विचार करून भरीव तरतूद देण्याची ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सादरीकरण केले.
यावेळी ऑनलाइन पद्धतीने नागपूर विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातून डॉ.माधवी खोडे-चवरे उपस्थित होत्या.
                                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या