Ticker

6/recent/ticker-posts

माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.....

चित्रा न्युज प्रतिनिधी
 एकोडी / गोंदिया :-माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त एकोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य एकोडी जिल्हा परिषद राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून राजेश (राजु) कटरे सामाजिक कार्यकर्ता व जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपस्थितांनी राजेश (राजु) कटरे व जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांनी खासदार प्रफुलभाई पटेल यांनी केलेल्या भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या विकासाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी दिपक रिणायत ग्राम पंचायत सदस्य, धर्मेन्द्र कनोजे माजी शाळा समिति अध्यक्ष, अरुणकुमार बिसेन शाळा समिति अध्यक्ष, वासुदेव बिसेन, महेंद्र कनोजे शाळा समिति सदस्य, आरिफ़ पठान, शारदा बिसेन शाळा समिति सदस्या, स्वाती पटले शाळा समिति सदस्या, बाळने ताई, पुजा पटले उपस्थित होते तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ताजने सर, हरिणखेडे सर, शिक्षिका हरिणखेडे, शिक्षिका बंसोड व सर्व शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितिने सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या