चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- माढा येथील कलाशिक्षक लिटिल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल, शेटफळ. येथे कार्यरत असणारे अण्णाराव नागनाथ खंडागळे यांचा रोटरी क्लब ऑफ माढा यांच्यावतीने सेवानिवृत्त उपसचिव मंत्रालय सुनील रावडे साहेब यांच्या शुभहस्ते .
मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कलाशिक्षक अण्णाराव खंडागळे यांना शिक्षण क्षेत्रातील बारा वर्षाच्या अनुभव आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी एलिमेंट्री,इंटरमिजिएट शासकीय ग्रीड परीक्षेचे मार्गदर्शन करणे व शंभर टक्के निकाल लावणे. चित्रकला प्रदर्शन घेणे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची व्यक्ती चित्रे पेन्सिल शेडिंग माध्यमातून हुबेहूब रेखाटने ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक व कलाक्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांना अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणूनच त्यांचा रोटरी क्लब ऑफ माढा यांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयराज डोंगरे संस्थेचे मार्गदर्शक अजय काका डोंगरे, प्राचार्या फराह शेख, कार्यालयीन अधीक्षक चेतन कोरके, प्रा. दत्तात्रय चव्हाण डॉ. सोमेश्वर टोंगळे,डॉ.सुभाष पाटील, सचिन घाडगे, प्रवीण भांगे, औदुंबर पवार,चित्रकार देवेंद्र निम्बर्गीकर दीपक कन्ना, वैभव गायकवाड व शैक्षणिक कला क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या