चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी : लहानशा अपघाताने गंभीर जखमी झालेल्या आईचा एम्स हॉस्पिटल नागपूरमध्ये उपचार सुरू असताना अचानक आईचे ‘ब्रेन डेड’ झाले. कुटुंबावर शोककळा पसरली. त्या दु:खातही मुलगा सोपान रामेश्वर निखाडे आपल्या आईला अवयवरुपी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने दोन्ही किडनी, यकृत व नेत्रदान केले. यामुळे तीन रुग्णांना नवे जीवन मिळाले.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खैरी/पिंपळगाव येथील रहिवासी गोपिका रामेश्वर निखाडे (वय 68) ह्या अवयवदात्या महिलाचे नाव. आहे.माहितीनुसार गोपिका निखाडे नातवाबरोबर मुलींच्या गावी जात असताना अचानक अपघात झाल्याने लगेच (ता.27) फेब्रुवारी गुरुवार रोजी गोपिकाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे दाखल केले. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. उपचारात शर्थीचे प्रयत्न सुरू असताना त्यांची प्रकृती खालवत गेली. 2 मार्च रोजी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. याची माहिती मुलगा सोपान निखाडे यांना देण्यात आली.अचानक आई, मृत झाल्याच्या दु:खात कुटुंब होते. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व सांगितले. आपल्या आईला अवयवरूपी जिवंत ठेवता येईल, या आशेवर मुलगा सोपान निखाडे व नातू शुभम निखाडे अवयवदानाला परवानगी दिली. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ला देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे दोन्ही किडनी व यकृत गरजू रुग्णाला तर, दोन नेत्र आयबँकेला दान करण्यात आले.
0 टिप्पण्या