Ticker

6/recent/ticker-posts

श्री दत्त भागीरथी नगर एव्हरग्रीन महिला ग्रुपच्या पुढाकाराने अंनिसने बाळाबाईंना जटामुक्त केले.

चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर :-श्री दत्त भागीरथी नगर येथील बाळाबाई रामचंद्र मोहिते यांच्या केसांत गेल्या पाच वर्षांपासून जटा वाढलेल्या होत्या. बाळाबाई मोहिते या परिसरातील लोकांच्या घरी धुणे, भांडी करण्याचे काम करतात. बाळाबाई यांच्या केसातील जटा याच नगरातील रहिवासी असलेल्या प्राथमिक शिक्षिका सुनिता वाळवेकर यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी बाळाबाई यांना भेटून त्यांना जटा काढण्याविषयी समजावले. बाळाबाई यांनीही आपल्याला जटांचा शारीरिक, मानसिक त्रास होत असल्याचे सांगून जटा निर्मूलन करण्यास तयारी दर्शवली. बाळाबाई जटा निर्मूलन करण्यास तयार झाल्यावर सुनिता वाळवेकर व रविंद्र वाळवेकर या दांपत्याने श्री दत्त भागीरथी नगर एव्हरग्रीन महिला ग्रुपच्या सर्व  सदस्यांनी याविषयी चर्चा केली. त्यांनतर सर्वांनी कृष्णात स्वाती आणि स्वाती कृष्णात या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करून बाळाबाई यांचे जटा निर्मूलन करण्याची विनंती केली. 

शुक्रवार दि. १४ मार्च रोजी धुलीवंदना निमित्त श्री दत्त भागीरथी नगर एव्हरग्रीन महिला ग्रुप आणि नागरिकांच्या उपस्थितीत जटा निर्मूलनाचा सामाजिक उपक्रम पार पाडण्यात आला. याप्रसंगी अंनिस कोल्हापूर शहर शाखेच्या कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात व कृष्णात स्वाती यांनी जटा निर्मूलन करून उपस्थितांना मार्गदर्शन  केले. जटा मुक्ता झाल्यावर बाळाबाई यांनी डोक्यावरचे ओझे उतरल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी जटा निर्मूलनात पुढाकार घेतल्याबद्दल वाळवेकर दांपत्याचे आभार मानले. बाळाबाई जटा निर्मूलन करून घेतलेबद्दल वाळवेकर दाम्पत्य आणि उपस्थित सर्वांच्या वतीने श्रीमती वासंती साधले यांचे हस्ते बाळाबाई यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 
याप्रसंगी कमल कुंभार, सुहास पिळणकर, जिजाबाई प्रभावळे, पूनम घोडके, धनश्री मोरे, रेडेकर काकी, अनुप रेडेकर, गीतांजली कबुरे, श्रद्धा पिळणकर, शामला पवार, प्रतिभा पाटील, संगीता पाटील, प्रतिभा पाटील, कांबळे काकी, मेघना वाळवेकर,  महेश ओलेकर, अभिराम साधले, चिरंतनी स्वाती कृष्णात उपस्थित होते. उत्तम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या