Ticker

6/recent/ticker-posts

जयकिसान सहकारी दूध संस्था मर्या. डोणगाव या संस्थेच्या इमारतीसमोर अनाधिकृत चालू असलेले बांधकाम त्वरित थांबवा :- संस्थेचे सचिव सोमीनाथ सातव...


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.

जामखेड :- जय किसान सहकारी दूध संस्था मर्यादित डोणगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर डोणगाव मधील मिळकत नंबर 239 मधील जयकिसान सहकारी दूध संस्थेपुढे अनाधिकृत बांधकाम चालू असून ते त्वरित थांबवावे, यामुळे सहकारी दूध संस्थेला अडचण असून ते गावात कोणत्याही प्रकारचा शासकीय/  प्रशासकीय देखरेख नसून अनाधिकृत बांधकामास व व्यवहारात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.
        गावाचे व जनतेचे हित न करता कोणी कुठेही व्यवसाय आणि बांधकाम करत आहेत. तरी मला यायची हरकत असून बांधकाम त्वरित थांबवण्याबाबतचा अर्ज मा. शुभम जाधव साहेब 
गटविकास अधिकारी पं. स. जामखेड व ग्रामपंचायत डोणगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात दि. 20/11/2024 रोजी केला होता.
        त्यानंतर 24/01/2025 रोजी सदरचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय डोणगाव येथे कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आलेला होता, परंतू आज पर्यंत डोणगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच ग्रा. पं. सदस्य यांनी कोणतीही कारवाही केली नाही. येत्या 10 दिवसात कोणतीही कारवाही नाही केल्यास लवकरच पंचायत समिती जामखेड येथे उपोषणास बसणार असल्याचे संस्थेचे सचिव सोमीनाथ सातव यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या