चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सहकारी संघ मर्यादित र.न.104 या संस्थेची सन 2024 ते 2025 करिता नवनिर्वाचित संचालक पदाकरिता निवडणूक प्रथम सभा ही 18 मार्च ला घेण्यात आली आहे असून संघाच्या अध्यक्षपदी संजय मते तर उपाध्यक्षपदी राकेश मलेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.माजी जिल्हा अध्यक्ष लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक घेण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्यकारणीमुळे एकूण 15 संचालक पदाधिकारी आहेत. अविरोध निवडणूक पार पडल्याने जिल्हास्तरावरून सर्व निवडक पदाधिकारी यांच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या