Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा; बिऱ्हाड आंदोलनाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :- शासकीय आश्रम शाळा रोजंदारी कर्मचारी वर्ग ३ वर्ग ४ यांच्या मागण्या पूर्ण करा,अशी  मागणी  बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, सुनिल भील,सुभाष भील,रंगीत भील,रमेश भील, सुरेश भील, जितेंद्र भील,अनिल भील,अप्पा कुवर,भुरेसिंग भील,चंद्रसिंग सोनवणे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                                शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने दिनांक ९ जुलै २०२५ पासून आदिवासी विकास विभाग नाशिक समोर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे,या आंदोलनाला बिरसा फायटर्स संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे.शासकीय आश्रम शाळा रोजंदारी कर्मचारी वर्ग ३ वर्ग ४ बिऱ्हाड आंदोलन दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांनी आंदोलना दरम्यान  १६ जून २०२५ रोजी आंदोलन स्थळी भेट घेऊन तात्काळ १७ जून २०२५ रोजी बैठकीस स्वतः आमंत्रित करून मंत्री गिरीशजी महाजन व आदिवासी विकास मंत्री यांनी कर्मचारी यांना बैठकीत २ दिवसांमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतू १५ ते १६ दिवसांचा अवधी उलटूनही व संघटनेचे पदाधिकारी सदस्य वैयक्तिकरित्या २ वेळा भेट घेऊन देखील अद्यापही वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी यांच्या मागण्याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे.रोजंदारी कर्मचाऱ्यांऐवजी बाह्य स्रोत द्वारे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.हा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय करणारा निर्णय आहे.कंत्राटी भरती व खाजगीकरणाला आमचा विरोध आहे.कोणतीही भरती ही कायमस्वरुपी करा.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.सर्व रोजंदारी वर्ग ३ वर्ग ४ कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घ्यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनास करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या