Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे याचे अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन...चेतनासेवा संस्था वर फसवणुकीचे गुन्हा दाखल करावे :- जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- चेतनासेवा संस्था लातूर यांच्या नर्सिंग फार्मसी पॉलीटेक्निकल कॉलेजवर गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे आरोप झाले असून शासनाची दिशाभूल करून बनावट पद्धतीने चार वेगवेगळी कॉलेजेस मंजूर करून घेतल्याचा आरोप डॉक्टर सुहासिनी सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.संबंधित संस्थेने शासन व विद्यापीठ यंत्रणेला बसवण्यासाठी बनावट दस्तऐवज सादर केलेत वास्तविक एकाच इमारतीत चार कॉलेज दाखवण्यासाठी खोटे कर्मचारी पत्र प्राचार्याने निरीक्षण समिती यांना लाच देण्याचा प्रकरण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ कागदपत्र दाखल करून अनुदान आलं असून प्रत्यक्षात कोणतेही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही निरीक्षण समिता येणार असल्याची खबर मिळताच तात्पुरते बनावट कर्मचारी नेमले जातात असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी बोलताना बोलताना सांगितले आहे की,चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेने शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून एकाच जागेमध्ये चार कॉलेजला मान्यता घेण्याचं काम केलेलं आहे. या चारी कॉलेजला मान्यता घेण्यासाठी खऱ्या अर्थाने साडे दहा एकर जागेची गरज आहे परंतु शासनाच्या वेगवेगळ्या ज्या समित्या  येतात त्या प्रत्येक समितीला तीच जागा दाखवली जाते, तीच इमारत दाखवली जाते, तेच कर्मचारी दाखवले जाते आणि शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करण्यात येते. फसवणूक करून त्या संस्थेने चार कॉलेजला शासनाची मान्यता मिळवलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे त्या संस्थेच्या अध्यक्षा सचिव आणि संचालक मंडळावर आणि त्यांनी जे बनावट त्या ठिकाणचे कर्मचारी दाखवले या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा
असे आमची  मागणी आहे व दुसरी मागणी आमची अशी आहे की,ज्या शासनाकडून ज्या चार वेगवेगळ्या संस्थेला मान्यता देण्यात आलेत कॉलेजला त्यामध्ये एन एम असेल जे एन एम असेल फार्मसी असेल पॉलिटेक्निकल असेल त्या सर्व विद्यापीठाच्या सर्व प्रतिनिधींना एकाच वेळेस बोलावून त्या ठिकाणी त्या शाळेच्या इमारती दाखवल्या किंवा जी शाळेची संस्थेची जागा दाखवली ती प्रत्येकाने जर आपल्या जागा विचारली तर त्यावेळेस संस्थेकडे दुसरी जागा दाखवायला नाही फक्त तीन एकर जागेत दोन-तीन इमारती करून शासनाची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी  संस्थेचे डॉक्टर सुहास बिबीशन सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी केले आहे. आणि या संस्थेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गेले दोन वर्षापासून जातीचे दाखले आधार कार्ड बँकेचा पासबुक उत्पन्न दाखला घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागासवर्गीयांची स्कॉलरशिप हाडप करण्याचा काम केलेला आहे त्या ठिकाणी संस्थेकडे कुठल्याही कर्मचाऱ्यांचा स्टॉप नाही आणि संस्था ही बनावट कागदपत्र देऊन या ठिकाणी मान्यता घेत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भूमिका घेऊन आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या समोर उपोषण करत आहोत आणि आमची शासनाकडे मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये चार वेगवेगळ्या कॉलेज आहेत त्यांचे समितीचे सर्व सदस्यांनी त्याठिकाणी एकत्र यावं आणि त्याचप्रमाणे त्या माणसांनी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हाडप केली ती शासनाने वसूल करावी आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यावेळी बोलताना म्हणाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या