धनाजे ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :धडगांव तालुक्यातील मौजे धनाजे बुद्रक येथे हवेत गोळीबार करीत लोकांना रस्त्यावर अडवून मारहाण करीत दहशत माजवणा-या टोळीतील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन धनाजे ग्रामस्थांनीही पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांना दिले. पोलीस अधीक्षक यांनी तक्रारीवर अर्धा तास चर्चा केली व आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,चंद्रसिंग शंकर पावरा,तुकाराम पावरा,अनिल सुकलाल पावरा,अनिल कुटा पावरा,चंद्रसिंग जहांगीर पावरा,मेरसिंग जंगल्या पावरा,आनंदा शिंदे,रोहीदास पावरा,मेरसिंग लालसिंग पावरा सह एकूण ५० ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगांव यांना मौजे धनाजे येथील ग्रामस्थांनी दिनांक २० मार्च २०२५ रोजी मौजे धनाजे बुद्रक येथे दहशत निर्माण करणा-या टोळीवर कारवाई करणेबाबत पत्र देण्यात आले आहे.परंतू अद्यापही दहशत माजवणा-या टोळीवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. गांव धनाजे बु. येथे दिनांक १७ मार्च २०२५ रोजी भोगवाडे येथील होळीच्या रात्री ७ वाजता धनाजे ते भोगवाडे रस्त्यावर होळीला जाणा-या लोकांना रस्ता अडवून दमदाटी करणे,पोलीस श्री.जामसिंग वळवी यांचीही गाडी अडवली. गर्दी जास्त झाल्याने गांवातील व्यक्ती धनसिंग मोग्या पावरा याने विचारले असता सदर व्यक्तीस मारहाण करण्यात आली.राकेश हिम्मत पावरा गाव -उमराणी,विजयसिंग मेरसिंग पावरा गाव-रोहजरीपाडा, रतन चिमा पावरा गांव- मुंगबारी,राहूल मेरसिंग पावरा गांव- उमराणी या सर्व लोकांनी रात्री ११.३० वाजे दरम्यान धनाजे गांवात येऊन भोगवाडे रस्त्यावर हवेत गोळीबार केला.ही घटना रमेश लिहा-या पावरा गांव धनाजे बुद्रक यांनी पाहिली आहे.
तरी हवेत गोळीबार करून गांवात दहशत माजवणारे राकेश हिम्मत पावरा, राहुल मेरसिंग पावरा,विजयसिंग मेरसिंग पावरा,रतन चिमा पावरा यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी धनाजे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
0 टिप्पण्या