आगीत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या. वसाहतीतील रस्त्यावर उभ्या असलेल्या चार-पाच दुचाकीही जळाल्या. जवानांनी झोपड्यांमधून 100 पेक्षा जास्त गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी अनेक कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. आगीत झोपड्यांमधील सर्व गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने रहिवाशांचे अश्रू अनावर झाले. आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लाकडी वाड्याला आग–छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. लाकडी वाडा पेटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने भीती पसरली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या काका हलवाई मिठाईच्या दुकानातून जवानांनी प्रवेश करून इमारतीतून पाण्याचा मारा केला. लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर दोन दुकानांनी आगीच झळ पाेहोचली.जुन्या वाड्यातील आठ ते दहा रहिवासी आग लागल्यानंतर बाहेर पडल्याने बचावले. 50 जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला हाेता. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
0 टिप्पण्या