चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-हत्तीरोग उपपथक, तिवसा आणि आरोग्य उपकेंद्र, वरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 व 25 एप्रिल या दोन दिवशी संयुक्तरीत्या "जागतिक हिवताप दिन" साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने वरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच दादासाहेब बोके विद्यालय येथे विद्यार्थ्यांना हिवताप या आजाराविषयी माहिती देण्यात आली तसेच त्यांना यावर प्रतिबंध करण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येईल तसेच गप्पी मासे याबद्दल माहिती देण्यात आली. गप्पी मासे हे कशाप्रकारे डास अळी यांना खातात यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच नागरिकांमध्ये हिवताप जनजागृती करण्यासाठी रॅली चे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यक्षेत्र येथे "गप्पी मासे धडक" मोहीम राबविण्यात आली.. उपकेंद्र अंतर्गत कार्यक्षत्रा मध्ये गप्पी मासे सोडण्यात आले यासाठी उपस्थित असलेले हत्तीरोग उपपथक येथिल श्री.विठ्ठल राठोड सर, श्री.वानखडे साहेब, श्री.वाघ साहेब,तसेच ऍलोपॅथिक दवाखाना, वरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पियु खेतान मॅडम तसेच समुदाय आरोग्य अधिकारी कुकडे मॅडम, आरोग्य सेवक श्री. हरीश कठाने तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


0 टिप्पण्या