चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टूकी येथे ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिनांक २५ मार्च २०२५ रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शहादा यांनी चौकशी अधिकारी म्हणून एम आर देव विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांची नियुक्ती केली आहे.चौकशी अधिकारी यांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी आदेशानुसार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायत टूकी येथील सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत टूकी यैथे संपूर्ण दप्तर तपासणीसाठी घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले व चौकशी केली.चौकशीत ग्रामसेवकाने फक्त १ रजिस्टर सादर केले असून तेही आताच बनवलेले व अपूर्ण होते.म्हणून तक्रारदार यांची ज्या मुद्द्यांवर तक्रार आहे.ती सर्व माहिती तक्रारदार यांना तपासणीत द्यावी,अन्यथा सख्त कारवाई केली जाईल, अशी सूचना चौकशी अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवकास दिली आहे.
उपसरपंच ग्रामपंचायत टूकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टूकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत आहेत, भ्रष्टाचार करीत आहेत. ग्रामसेवक यांनी दिनांक ८/११/२०२२ रोजी १५ व्या वित्त आयोगातून डीएससीने बिना काम करता एकुण दोन लाख साठ हजार रूपये (२६००००)काढले आहेत. तसेच ग्रामपंचायत टूकी येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत. उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे.तरी ग्रामपंचायत टूकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तक्रारीद्वारे करण्यात आली होती.
0 टिप्पण्या