Ticker

6/recent/ticker-posts

गुंज येथील पीडितांच्या भेटीचा अजित पवारांचा असंवेदनशीलपणा !


पीडितांना बसवले लोखंडी बॅरिकेट्समध्ये


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हिंगोली : गुंज, ता. वसमत जि. हिंगोली येथे ट्रॅक्टर अपघातात झालेल्या 7 महिलांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तब्बल 23 दिवसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वसमत तालुक्यातील गुंज येथे भेट द्यायला आले.

सकाळपासून कधी न फिरलेले अधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकापेक्षा संख्येने जास्तीचे पोलिस विभागाच्या विविध सेलचे कर्मचारी अधिकारी यांनी गुंज गाव फुलून गेले होते. दिवसभर अजित पवारांची वाट पाहून थकलेल्या या गावातील पीडितांना वाटले की, राज्याचा उपमुख्यमंत्री आपल्या दुःखात सामील होण्यासाठी येतोय. खचलेल्या मनाला थोडा आधार देण्यासाठी. परंतु, झाले अगदी उलटे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पीडित कुटुंब, गावातील नागरिक यांना एका विशिष्ट अंतरावर बसवून मध्ये लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले होते. पीडितांशी संवाद करण्याच्या सर्व शक्यता इथेच संपवली. 

या दरम्यान फक्त पीडितांच्या चेकचे वितरण केले आणि आल्या पावलांनी उपमुख्यमंत्री निघून गेले. यानंतर गावातील नागरिकांनी, पीडितांनी नाराजी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गुंज गावाला भेट देऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले होते. प्रशासनाला धारेवर धरले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या