चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : मीडियाच्या माध्यमातून त्याची जात विचारली नाही पण, धर्म विचारला असे सांगून हिंदू - मुस्लिम राजकारण करायचा जो प्रयत्न चालू आहे, त्याचा पूर्ण निषेध करतो.
पहलगाम मध्ये ज्यांना गोळ्या घालण्यात आल्या ते भारतीय आहेत. या देशाचे नागरिक आहेत आणि सन्माननीय आहेत. त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. त्यांचा मृत्यू आपण धर्माशी जोडू नये. एवढं पथ्य शासनाने पाळावे. केंद्र शासनाने दहशतवाद्यांविरोधात यावेळी कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली
0 टिप्पण्या