चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर समृद्धी फार्मसी संचलित 'मेडप्लस' मेडिसिन दालनाचे भव्य उद्घाटन उत्साही वातावरणात पार पडले. हा सोहळा औषध व्यवसायातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतिक ठरला.
उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बार्शीचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांची उपस्थिती. त्यांच्या शुभहस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रमेश (आण्णा) पाटील, माजी नगराध्यक्ष, बार्शी हे होते.
या कार्यक्रमाला नगरपरिषदेतील अनेक मान्यवर नगरसेवक उपस्थित होते –
मा. भारत पवार (सर), मा. दीपक (आबा) राऊत (गटनेते), मा. अमोल वायकुळे, मा. कुमार डमरे, मा. विजय चव्हाण (सर), मा. मदन (दादा) गव्हाणे, मा. रितेश (आण्णा) वाघमारे, तसेच भाजप तालुका अध्यक्ष मा. बबन (आण्णा) गडदे आणि वरिष्ठ पत्रकार गणेश गोडसे (दै. पुढारी) यांनी कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त करून दिले.
'मेडप्लस' – एक विश्वासार्ह सेवा केंद्र
‘मेडप्लस’ हे केवळ औषध विक्री केंद्र नसून, ग्राहकांना आवश्यक ते औषध सुलभ दरात, वेळेवर आणि विश्वासाने मिळावे यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आधुनिक संगणकीकरण, प्रशिक्षित कर्मचारी, आणि वेळेवर सेवा हे या केंद्राचे वैशिष्ट्य राहणार आहे. विविध कंपन्यांची दर्जेदार औषधे येथे उपलब्ध असून, औषधांमध्ये सवलतीसह सल्ला देखील दिला जाणार आहे.
दालन उभारणीमागचा सेवाभाव:
या उपक्रमामागे श्री. अमर कुंडलिक ताकभाते (पिंपरकर) आणि त्यांच्या पत्नी यांचा स्पष्ट सेवाभाव असून, त्यांनी शहरातील नागरिकांना चांगली व परवडणारी औषधसेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हणाले की, "हे केवळ दुकान नाही, तर आमच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा एक भाग आहे. कोणताही गरजू माणूस औषधावाचून परत जाऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे."
कार्यक्रमाचे आयोजन आणि जनमानसातील उत्स्फूर्त प्रतिसाद: कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व समर्पक पद्धतीने करण्यात आले होते. परिसरातील नागरीक, व्यापारी, डॉक्टर मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या मंगल दिनी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याने वातावरण अधिकच पवित्र आणि प्रेरणादायी बनवले. राऊत यांच्या शुभहस्ते मेडप्लसचे उद्घाटन, बघा थेट लाईव्ह"
0 टिप्पण्या