Ticker

6/recent/ticker-posts

इस्लामपूर मध्ये आदर्श मुख्याध्यापक श्री विजय देशमुख व आदर्श. शिक्षक श्री संतोष महामुनी यांचा नागरी सत्कार....

      
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच ( शनिवार दिनांक 29 -3 - 2025 ) पार पडले यामध्ये इस्लामपूर गावचे सुपुत्र श्री विजय देशमुख यांना आदर्श मुख्याध्यापक व श्री संतोष महामुनी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर इस्लामपूर येथे दोघांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. श्री विजय देशमुख यांचा सपत्नीक सत्कार श्री रत्न शिव पवार यांचे शुभहस्ते पार पडला श्री संतोष महामुनी यांचा सत्कार इस्लामपूर गावचे माजी सरपंच श्री साहेबराव देशमुख यांचे शुभहस्ते पार पडला. मनोगता मधून सर्वांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या.. सत्काराला उत्तर देताना दोघांनीही हा पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली व उत्साह वाढला अशी भावना व्यक्त केली तसेच सर्वांनी शुभेच्छा दिल्या व दोघांचाही नागरी सत्कार केल्याबद्दल मनापासून आभार मानले 
      या कार्यक्रमा वेळी श्री धनंजय देशमुख माणिकराव देशमुख दगडू देशमुख संजय देशमुख निलेश देशमुख सुहास देशमुख डॉक्टर सचिन देशमुख उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या