Ticker

अड्याळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त


गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , समाज प्रबोधन कार्यक्रम, अड्याळ ते शांतीवन बुद्ध विहार चिचाळ पर्यंत बाईक रॅलीचे , व सायंकाळी अड्याळ येथे डीजे रॅलीचे
 करण्यात आले होते आयोजन



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा _भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वैशाली बौद्ध विहार येथे  अड्याळ येथे सायंकाळी
६ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आलेला होता .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवा मुंगाटे, लालचंद रामटेके, दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे, डॉ. गणेश मेश्राम , अशोक वाहने ,प्रकाश दहिवले, ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान, ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे,गौतम जनबंध, वैशाली बुद्ध विहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे, युवा उद्योजक देशमुख ,  उपस्थित होते . या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थित तथागत गौतम बुद्ध ,सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज, रमाबाई, सावित्रीबाई, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार सुद्धा या ठिकाणी व्यक्त केले. संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी व बारावी मध्ये प्रथम ,द्वितीय, द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे रात्री
8 वाजता युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचा संगीतमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रबोधनकार भावेश कोटांगले यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला. 14 एप्रिल  2025 ला वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ , मैत्रय बुद्ध विहार शहर वार्ड क्रमांक ४,रमाबाई बुद्ध यारो शहर वार्ड क्रमांक ४ , पंचशील बुद्ध विहार सहायता नगर वार्ड क्रमांक १ ,सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ वार्ड क्रमांक ५ ,, येथून सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन शांतीवन बुद्ध विहार चिचाळ पर्यंत करण्यात आले होते.सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत धम्म रॅली व झाकी चे आयोजन करण्यात आलेले  आले होते. रॅलीचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे त्यांच्या हस्ते करण्यात आले.. 15 एप्रिल 2025 ला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले असून सायंकाळी६.३० वाजेपासून सामूहिक भोजनाचे आयोजन वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथे करण्यात आलेले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जयंती समारोह उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक वाहने ,कोषाध्यक्ष मुनीश्वर बोदलकर,उपाध्यक्ष प्रकाश दहिवले,सहसचिव गणेश मेश्राम , सहकोषाध्यक्ष विकास टेंभुर्णे ,सांस्कृतिक विभाग गौतम जनबंधू , दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ संपादक पत्रकार संजीव भांबोरे, पंकज वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य आशिक  अंबादे, ग्रा .प. सदस्य विपिन टेंभुर्णे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे , आशिष नैतामे ग्रामपंचायत सदस्य ,  सदस्य सुधीर उके ,मयूर खोब्रागडे,, रामदास खोब्रागडे,कल्पना जांभुळकर, वर्षा रामटेके, तरुणा डोंगरे, कृतिका डोंगरे,साधना कासारे ,दिनेश्वरी वानखडे, संगीता लोणारे, बानूबाई देशपांडे, अमोल थुलकर ,नलूबाई कराडे, सुरेश उके ,आशिष मेश्राम, प्रमोद वासनिक यांनी त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक ,उपासिका व बहुजन बांधवांनी सहकार्य करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या