Ticker

6/recent/ticker-posts

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात उन्हाळी संस्कार शिबिर संपन्न


        
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-नंदलाल पाटील कापगते विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 26 एप्रिल पासून सुरू झालेल्या पाच दिवशीय या शिबिरामध्ये विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचा आणि कलांचा आनंद घेतला. 
          या शिबिरामध्ये प्राणायाम, योगासन, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कराटे, बॅडमिंटन यासारख्या आधुनिक व पारंपारिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी  मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या व्यतिरिक्त डान्स व नृत्याचा कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक स्वास्थ आणि सांघिक भावना व कलात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा होता. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात केली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग केला, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका आर. बि. कापगते मॅडम यांनी केल्या.
          शिबिराच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन तसेच सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षक,  पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       शाळेचे मुख्याध्यापिका आर.बी.कापगते व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डी.एस.बोरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. पालकांकडून देखील या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
        शिबिरकरिता सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या