Ticker

6/recent/ticker-posts

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर- खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार ४१ हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी ७१ हजार ५२८ क्विंटल बियाण्यांची मागणी असून  ३ लाख ९१ हजार १८९ मे. टन रासायनिक खताची मागणी असून ३ लाख १ हजार ४६८ मे. टन इतके आवंटन मंजूर आहे.

 शेतकऱ्यांसाठी पुरेशा व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्धतेचे कृषी विभागाने नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला दिले.
 जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रविंद्र पाटील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, खत, बियाणे उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पिकनिहाय प्रस्तावित पेरणीक्षेत्र

 जिल्ह्याचे पिकनिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र याप्रमाणे- तृणधान्य पिकांचे क्षेत्र २ लाख ३३ हजार २३६ हेक्टर, कडधान्य पिके- ५६ हजार ५३६ हेक्टर, गळीतधान्य ४० हजार ४७२ हेक्टर आणि कापूस ३ लाख ५८ हजार ७९७ हेक्टर असे एकूण ६ लाख ८९ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे.
बियाणे मागणी
 पिकनिहाय बियाणे मागणी याप्रमाणे- ज्वारी २७ क्विंटल, बाजरी ३६४ क्विंटल, मका ३ ३ हजार ३८४ क्विंटल, तूर २१८२, मुग-३८६, उडीड १७६, भुईमुग २२९, सूर्यफूल ७, तीळ-३, कपूस-८९७०, सोयाबीन-२५ हजार ७९९  असे एकूण ७१ हजार ५२८ क्विंटल बियाणे मागणी आहे.

खतांची मागणी

 यंदाच्या खरीप हंगामासाठी  ३ लाख ९१ हजार १८९ मे.टन रासायनिक खतांची मागणी हे. त्यात  युरिया १ लाख ५० हजार ४९८ मे.टन., डीएपी ४६ हजार ५२५ मे.टन., एमओपी-२६ हजार २३९ मे.टन, एसेसपी-२८ हजार २० मे. टन खतांचा समावेश आहे. पैकी ३ लाख १ हजार ४६८ मे.टन खतांचे आवंटन मंजूर आहे. सद्यस्थितीत १ लाख ३४ हजार ३०२ मे.टन इतका साठा जिल्ह्यात शिल्लक आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच जिल्ह्यात एकूण ९५०० मे.टन खत साठा संरक्षित ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

ई-पॉसद्वारे खतांचे वितरण

खतांचे वितरण पॉस मशीनद्वारे केले जाते. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २६२४ परवानाधारक खत विक्रेते असून महाराष्ट्र खतनियंत्रण योजनेंत ११४७ विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्यासर्व विक्रेत्यांकडे पॉस मशिन्स आहेत. कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी अधिकारी यांनी ई- पॉस मशिनचे प्रशिक्षण घेतले आहे.
उत्पादक, विक्रेत्यांची तपासणी
 जिल्ह्यात एकूण २६१२ बियाणे विक्रेते, २६८० खत विक्रेते, किटकनाशके २४५९  असे एकून ७७५१ निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येते. तसेच निविष्ठा उत्पादक, साठवणूक केंद्र यांचीही तपासणी केली जाते. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर एक या प्रमाणे जिल्ह्यात १० भरारी पथकेही स्थापीत करण्यात आली असून  त्याद्वारे निविष्ठा गुणनियंत्रणावर संनियंत्रण ठेवण्यात येते. कपाशीचे बियाणे १५ मे नंतरच विक्री करावे,अशी सुचनाही यावेळी देण्यात आली आहे.

उगवण क्षमता तपासून पेरा सोयाबीनचे बियाणे

 सोयबीन बियाण्याची उपलब्धता २५ हजार ७९९ क्विंटल असून त्यात शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले बियाणे १६ हजार ७७० क्विंटल आहे. सोयाबीन  बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच ते वापरावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. 

तक्रार निवारण कक्ष आणि टोल फ्री क्रमांक

 जिल्हास्तरावर एक, प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे १० निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दि.१५ मे ते १५ ऑगस्ट  आणि रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे कक्ष कार्यरत राहतील. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण होण्यासाठी कृषी विभागामार्फत १८०० २३३ ४००० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सअप क्रमांकही शंकानिरसन , तक्रारींसाठी उपल्ब्ध करुन देण्यात आला आहे. 
०००००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या