Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रकांत रघुवंशीवर गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक नंदूरबार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा आदिवासी संघटनांचा इशारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :-आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी शहादा येथील शिवसेना शिंदेगटाच्या  कार्यक्रमात दिनांक १६ मे २०२५ रोजी जाहीर रित्या आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीर रित्या अपमान केल्याबद्दल ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोरच बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.याबाबत पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,जिल्हा सचिव स्तेपन वसावे,सुनिल भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                       आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी याने शहादा येथील दिनांक १६ मे २०२५ रोजीच्या कार्यक्रमात जाहीर रित्या आदिवासी संघटनांना तीनपाट असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी आदिवासींचा जाहीर रित्या अपमान केला आहे.म्हणून त्यांच्यावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,अशी लेखी तक्रार मा.पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिनांक १६ मे २०२५ रोजी लेखी फिर्याद दिली आहे.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांनाही निवेदन देण्यात आले आहे.तरी सदर इसमाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला नाही,म्हणून आज आम्ही पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना शेवटचे निवेदन देत आहोत. चंद्रकांत रघुवंशीवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा नोंद न केल्यास येत्या आठ दिवसांत पोलीस अधीक्षक नंदूरबार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा आदिवासी संघटनांकडून पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या