Ticker

6/recent/ticker-posts

पहिला 'सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' दिशा पिंकी शेख यांना प्रदान!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे : कालकथित रामलिंग टेकाळे यांच्या स्मरणार्थ पहिला 'सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रसिद्ध लेखिका, कवियत्री, पारलिंगी समूहाचा बुलंद आवाज दिशा पिंकी शेख यांना पुण्यात प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, डॉ. शरद जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आला. यावेळी विलास टेकाळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या रोहिनीताई टेकाळे, प्रबुद्ध भारताचे धनाजी कांबळे, सुशील म्हसदे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा अनिताताई चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

पाक्षिक प्रबुद्ध भारतास आर्थिक मदत ―
प्रबुद्ध भारताचे व्यवस्थापक विलास टेकाळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने अनिता विलास टेकाळे यांच्या हस्ते पाक्षिक प्रबुद्ध भारतास २५ हजारांची आर्थिक मदत केली. 
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या