गटविकास अधिकारी शहादा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन
चित्रा न्यूज प्रतिनिधी
नंदुरबार: मनरेगा योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी २६८०० रूपये व शौचालय बांधकामासाठी १२००० रूपये व विहीर खोदकामासाठी ३ लाख ९९ हजार रूपये
अनुदान लाभार्थ्यांस मिळावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,लोहाराचे सुरेश पवार, टुकीचे दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
घरकुल योजना म्हणजे केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे होय.ज्यांचे कच्चे घर आहे किंवा जी लोक बेघर आहेत, अशांना या योजनेतून घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करते.या योजनेतून घरकुल लाभार्थ्यांना १२०००० रूपये घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते व मनरेगा योजनेअंतर्गत २६८०० रूपये व शौचालय बांधकामासाठी १२००० रूपये अनुदान दिले जाते.शहादा तालुक्यात घरकूल लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही मनरेगा योजनेअंतर्गत २६८०० रूपये व शौचालय बांधकाम साठी १२००० रूपये अद्याप मिळाले नाहीत. म्हणून घरकुल बांधकामासाठीची मनरेगा योजनेअंतर्गत २६८०० रूपये व शौचालय बांधकाम साठी १२००० रूपये मिळावेत. तसेच स्वतःच्या खाजगी खर्चातून व उसरवारीने पैसे घेऊन काही लाभार्थ्यांनी विहीर खोदली आहे,अशा सर्व लाभार्थ्यांस विहीर खोदकामासाठी ३ लाख ९९ हजार रूपये अनुदान मिळावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या