Ticker

6/recent/ticker-posts

सुरेल सुरावटींनी सजला श्री भगवंत महोत्सव २०२५; बेलासुलाखे, सपना अवस्थी, अयाज यांच्या गायनाने उद्घाटन सोहळा थाटात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर: बार्शीकरांच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा मानबिंदू ठरलेला 'श्री भगवंत महोत्सव २०२५' आज उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला. श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

भगवंत मैदानावर आयोजित केलेल्या या भव्य महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला सुलाखे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर, पार्श्वगायिका सपना अवस्थी, आणि 'महागायक' विजेता मोहम्मद अयाज यांच्या सुरेल कार्यक्रमाने—'सुर सरगम'—याच्या माध्यमातून करण्यात आली. या कार्यक्रमाला बार्शीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या उद्घाटन सोहळ्यास तहसीलदार एफ.आर. शेख, पोलीस उपअधीक्षक नालकुल, पोलीस निरीक्षक कुकडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, संतोष दादा निंबाळकर, ॲड. असिफभाई तांबोळी, रमेश आण्णा पाटील, अरुण भाऊ कापसे, अनिल काका डिसले, कौरव आप्पा माने, कुंडलिक भाऊ गायकवाड, बाबासाहेब मोरे, ॲड. अनिल पाटील, सुभाष शेठ लोढा, भारत पवार सर, देवस्थानचे पंच दादा बुडूख, केशव बापू घोगरे, लक्ष्मण बापू संकपाळ आणि बाळासाहेब घोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच, श्री भगवंत बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, बार्शी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, स्थानिक व्यापारी, पत्रकार बांधव, आणि श्री भगवंत देवस्थान पंच कमिटीचे सदस्य यांनीही आपली उपस्थिती नोंदवली.

बार्शीकरांच्या उदंड प्रतिसादामुळे महोत्सवाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली असून, पुढील काही दिवस हा महोत्सव विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी सजलेला असेल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या