Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेत "स्वातंत्र्यवीर सावरकर" यांची जयंती साजरी

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे आज दि.२८ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत स्थायी सभागृह कक्ष येथे "स्वातंत्र्यवीर सावरकर" यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपायुक्त सुप्रिया टवलारे, नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वाने, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, सहा.संचालक नगररचनाकार पवन आलूरकर, शहर अभियंता सुमंत पाटील, सहा-आयुक्त गुलाम सादेक, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्यासह मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या