Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये "राञीस गैरधंदे चाले"

प्रशासन "ना हाले,ना डुले"

परिसर बनलाय सार्वजनिक *डस्टबीन* 

तर स्थानिकचा रहिवाशी असलेला कर्मचारी बनलाय डीन..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालुक्यातील हाळी आणि परिसरातील रुग्णांना प्रथमोपचार मिळावा,म्हणुन हंडरगुळी येथे एक प्रा.आ.केंद्र (सरकारी दवाखाना) व उपकेंद्र आहे.
परंतू,येथील प्रा.आ.केंद्र विविध समस्या,असुविधा यांच्या गर्ततेमध्ये अडकले आहे.म्हणुन या बद्दल सतत तसेच परवाच आवाज उठवुनही "कुंभकर्णी झोप" घेतलेले तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील सरकारी दवाखाना हा *कबाडखाना* बनायला वेळ लागणार नाही.एकीकडे इतकी बेक्कार अवस्था प्रा.आ.केंद्राची झाल्याचे दिसते.तर दुसरीकडे याच केंद्राअंतर्गत असलेल्या उपकेंद्राची तर बातच वेगळी आहे.कारण लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या ऊपकेंद्रा मध्ये कोणताच अधिकारी कधी फिरकलाच नाही.तसेच या वार्डातील लोकप्रतिनिधीं सह वरीष्ठ अधिकारी ही कानाडोळा करीत असल्याने इमारतीसह परिसराची झालेली दुरावस्था तसेच "राञीस चालणारे गैर धंदे" बघवत नसल्याची कुजबूज येथील उपकेंद्र परिसरातील नागरीक करीत आहेत.
केंद्र व राज्य शासन जनतेचे आरोग्य निरोगी असले पाहीजे,यासाठी दर महिना करोडोंचा खर्च करते.तसेच देशभरातील सरकारी दवाखान्यात डाॅक्टर सह सर्व सुखसोयी पुरवित असून,राष्ट्रीय आरोग्य अभियान (N.R.H.M) अंतर्गत उपकेंद्रावर सेवा-सुविधा देण्यासाठी कंञाटी {समुदाय} आरोग्याधिकारी काम करीत असतात.तसेच आरोग्य उप केंद्रातून बाह्यरुग्ण नोंदणी,तपासणी, गरोदर मातांची नोंदणी,तपासणी व बालकांना लसीकरण,असंसर्गजन्य रोगांची तपासणी,क्षयरोग तपासणी या सारख्या आरोग्य सेवा,सुविधा येथे दिल्या जातात.पण हंडरगुळीचे  प्रा.आ.केंद्र हेच वीज,पाणी अपुरा औषधी स्टाॅक व कर्मचारी वर्ग आदी समस्यांच्या गर्ततेत सापडले आहे.तर याच केंद्राअंर्गत असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील समस्या,गैरसोय याच्या बद्दल न लिहलेले व बोललेलेच बरे ! इतकी बेक्कार अवस्था उपकेंद्राची झाल्याचे दिसत आहे.याच्या मैदाना मध्ये परिसरातील कांहीजणांनी जळणफाटा ठेवल्याचे व घरातील घाण,केर,कचरा टाकल्याचे दिसते.व या उपकेंद्रात वीज,पाणी नाही.तसेच दारं,खिडक्या व्यवस्थित नसल्यामुळे दोरीच्या तसेच सलाईनच्या नळीच्या साह्याने दारं बांधलेली दिसतात..!
*वरीष्ठ हाकतात मोबाईवरुन कारभार* कोणत्याही विभागाचा वरीष्ठ अधिकारी स्पाॅटवर न जाता एसी रुम मध्ये बसून पंटरच्या माध्यमातून कारभार बघत असेल तर,याला उंटावर बसून शेळ्या हाकणे.असे म्हणतात.परंतू,आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकारी हे माञ मोबाईल वरुन हंडरगुळीतील आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा कारभार बघतात.वरीष्ठ जर स्पाॅटवर येऊन योग्य तो कडक डिसीजन घेतला असता तर आज या दोन्ही केंद्रात असलेल्या समस्या,गैरसोयी ह्या तयार झाल्याच नसत्या.

स्थानिक कर्मचारी बनला डीन

अगोदरच या केंद्रात कर्मचा-यांची कमतरता आहे.त्यात स्थानिकचा व खुप वर्षापासून वरीष्ठांना आपलेसे करुन येथेच *फेविकाॅल* सारखे चिटकून नोकरी करीत असलेल्या एका कर्मचा-याच्या मनमानीला वैतागून एका नोकराने रितसर अन्य केंद्रात बदली करवुन घेतली आहे.तर कांहीजण करुन घेण्याच्या तयारीत आहेत.असे एका कर्मचा-याने नाव गुप्त ठेवायच्या अटीवर सांगितले.हा- येथील रहिवाशी असलेला कर्मचारी कित्येक वर्षापासून येथेच सेवा देत असल्याने तो वरीष्ठांना चांगलेच *मॅनेज* करत असावा!कारण,तो कधीही येतो नी जातो.म्हणुन येथील केंद्राचा तो कर्मचारीच डीन असल्या सारखा वावरत असल्याचे समजते. व हा सगळा प्रकार माहित असूनही याला पाठीशी घालणा-या वरीष्ठां - बद्दल वेगळीच कुजबूज अन्य स्टाॅप मधून ऐकू येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या