चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-वडाळा, मुंबई येथील संयुक्त एकजूट गृहनिर्माण सोसायटीजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज परिसरात गेल्या तीन वर्षांपासून बंदिस्त असलेले *बुद्ध विहार* आणि त्यामध्ये धुळीमधील महामानवाच्या प्रतिमा भीमसैनिक संघटनेच्या अथक प्रयत्नांद्वारे धम्म बांधवांसाठी पुनःश्च खुले करण्यात आले आहे.
स्थानिक धम्म बांधवांच्या लेखी निवेदनानुसार, काही असामाजिक तत्त्वांनी दडपशाहीचा अवलंब करत बुद्ध विहारावर अनधिकृत ताबा मिळवून त्यास टाळे ठोकले होते. यामुळे धम्म बांधवांना त्यांच्या पवित्र उपासना स्थळापासून वंचित रहावे लागले. वेळप्रसंगी बौध्द धम्माच्या प्रमुख कार्यक्रमावेळी बंदीस्त बुध्द विहाराच्या बाहेर रस्त्यावर बुध्द वंदना घ्यावी लागत होती. ही बाब भीमसैनिक संघटनेच्या निदर्शनास येताच, संघटनेने तात्काळ पुढाकार घेतला. कायदेशीर मार्गाचा अवलंब करत, स्थानिक पोलीस स्टेशनच्या सहकार्याने टाळे तोडण्यात आले आणि बुद्ध विहार सर्व धम्म बांधवांसाठी मुक्त करण्यात आले.
या यशस्वी प्रयत्नांमुळे
स्थानिक नागरिकांनी भीमसैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले.
साडेचार वर्षानंतर
दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन बुध्द विहारामध्ये प्रथमच सामुदायिक बुध्द वंदना घेऊन बौध्द धम्माची ज्योत प्रज्वलित करून 'भिमसैनिक' संघटनेमार्फत समतेचा रथ प्रवाहित करून 'चलो बुध्द की ओर' हा संदेश रुजवला आणि पुन्हा एकदा बुध्दाची शांती आणि बाबासाहेबांची क्रांती 'भिमसैनिक' संघटना प्रज्वलित करत आहे. हिच विचारधारा समाजाच्या समस्या निवारण आणि उन्नतीसाठी महत्वाची ठरते.
हा विजय धम्माच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी सामूहिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
0 टिप्पण्या