Ticker

6/recent/ticker-posts

मोडलगांवच्या सरपंच व ग्रामसेवकाला १ मे महाराष्ट्रदिनी झेंडावंदन करायचा विसर;कारवाईची बिरसा फायटर्सची मागणी

सरपंच म्हणतो;आग विझवायला गेलो म्हणून ध्वज फडकवला नाही;कोणा कोणाच्या घराला लागली आग?

चित्रा न्युज प्रतिनिधी 
धडगांव : १  मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत मोडलगांव कार्यालय येथे ध्वज न फडकावणा-या,झेंडावंदन न करणा-या सरपंचाला अपात्र करा व ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे दिलवर पाडवी,वन्या पावरा,सुनिल पावरा,प्रसाद पावरा, गणपत वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                           १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन होता.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रात हा दिवस "महाराष्ट्र दिन" म्हणून राज्यभर झेंडावंदन करून साजरा केला जातो.महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमशासकीय कार्यालये, शाळा,महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालये इत्यादी ठिकाणी नियमानुसार ध्वज फडकवून महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.परंतू धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांव येथील कार्यालयात १ मे २०२५ रोजी  महाराष्ट्र दिनी ध्वज फडकविण्यात आला नाही,झेंडावंदन करण्यात आला नाही.ग्रामपंचायत मोडलगांव येथे शासकीय नियमानुसार महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नाही.ग्रामपंचायत कार्यालयात या दिवशी गांवाचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
              ग्रामपंचायत मोडलगांव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिलवर पाडवी यांच्यावर गुंडांमार्फत जीव घेणा हल्ला करायला लावल्याप्रकरणी मोडलगांव चे सरपंच यांच्यावर पोलीस ठाणे धडगांव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.ग्रामपंचायत मोडलगांव येथील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतांनाच पुन्हा महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक हजर नाहीत, त्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला नाही,कार्यालयात ध्वज फडकवला नाही.यावरून मोडलगांव चे सरपंच व ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहेत, कामचुकार पणा करीत आहेत, आपले कर्तव्य बजावत नाहीत,मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे,असेच दिसून येते .म्हणून १ मे २०२५ रोजी मोडलगांव ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वज फडकवला नाही,झेंडावंदन केले नसल्याप्रकरणी मोडलगांव येथील सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अपात्र करावे व संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांच्याकडे करण्यात आली आहे. 
                        धडगांव तालुक्यात महाराष्ट्र दिनी ब-याच ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी ध्वज फडकवलाच नाही,असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत सरपंचांना विचारले असता,मी आग विझवायला गेलो होतो,म्हणून ग्रामपंचायतीत ध्वज फडकवला नाही.ग्रामसेवक ग्रामपंचायतीत का आले नाहीत? उपसरपंच व सदस्य काय करत होते? सगळ्यांच्याच घरांला आग लागली तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या