Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड शहरातील अनेक भागात पाण्यासाठी भटकंती / पाणी मिळत नसल्याने आक्रमक नागरिक,,


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक झालेल्या महिलांनी पाणीपुरवठा झोनल अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकल्या बांगड्या/ झोपडपट्टी आहे म्हणून पाणीपुरवठा केला जात नाही महिलांचा महानगरपालिकेवर आरोप/आक्रमक झालेल्या महिलांनी पाणी मिळाले नाही तर आयुक्तांच्या टेबलवर बांगड्या फेकून करणार आंदोलन. 

अँकर:पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नांदेड शहरातील दिलीपसिंग कॉलनी, गोवर्धन घाट, बोरबन, गोवर्धन घाट टेकडी , घरकुल वस्ती यासह इतर भागात महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात नाही, वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा जन अधिकाऱ्याच्या  विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अपविभाग, नांदेड विकास समितीचे शहराध्यक्ष दीपकसिंघ हजुरीया यांच्या नेतृत्वाखाली शैकडो महिलांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारत रोष व्यक्त केला. महिलांनी अधिकाऱ्याच्या टेबलावर बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला, उद्यापर्यंत पाणी नाही आलं तर झोपडपट्टी काय चीज असते हे आम्ही दाखवणार आहोत असा इशारा  सुद्धा दिला आहे. ,  तसेच महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढून महानगरपालिकेचे आयुक्ताच्या टेबलवर बांगड्या फेकून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या