Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाचे औचित्य साधत गुणवंतांचा सत्कार संपन्न




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : पुढील उज्वल शैक्षणिक दृष्टीने शालांत परीक्षा व मिळविलेले प्रावीण्य भविष्य ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावत असते.२०२५ वर्ग १० वी मध्ये विशेष प्रावीण्य व गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
स्थानिक गवराळा प्रभागातील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे व लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील शिक्षक शरद राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा भद्रावतीची विद्यार्थिनी कु. वैशाली राहुल बेताल हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ९५.४० टक्के गुण प्राप्त केले. कुमारी. दुर्गेश्वरी विनोद खापणे या मुलीने ९१.४०टक्के तर लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील विद्यार्थिनी कु. लक्ष्मी सुनिल बदखल हिने ९३ टक्के प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी बजावली. जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा वॉर्ड तर्फे ज्येष्ठ जगन्नाथ भक्तांच्या उपस्थितीत त्यांचा शाल श्रीफळ, ग्रंथ, देऊन उचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पांडूरंग कोयचाडे, बाबा निखाडे, सूर्यभान परचाके, बंडू परचाके, विनोद सावनकर, विनोद खापणे, सुनील बदखल, उप शहर प्रमुख मनीष बूच्चे, मंगेश येरमे,सुनिल आवारी,श्रीराम नवमी उत्सव समिती चे दिपक बदखल अमर सावनकर, संतोष डवरे, मेघा बोधे, नलिनी माणूसमारे, ज्योती आवारी आदी नागरिक उपस्थित होते.
 अहिल्यादेवी होळकर चौकात केक कापून व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करूनकार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या