मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठवलेंचे रिपाइंतर्फे भव्य स्वागत होणार
चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे अमेरिकेचा दौरा पूर्ण करून येत्या बुधवार दिनांक 11 जुन रोजी सकाळी 11 वाजता मुंबईत परतणार आहेत.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 येथे बुधवार दि.11 जुन रोजी सकाळी 11 वाजता ना.रामदास आठवले यांचे मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्या जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सहकुटुंब दिनांक 2 जुन पासुन अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.आठ दिवसांचा अमेरिका दौरा पूर्ण करुन बुधवार दिनांक 11 जुन रोजी सकाळी 11 वाजता ते मुंबईत परतणार आहेत.मुंबईच्या विमानतळावर टर्मिनल 2 येथे ना.रामदास आठवले यांचे रिपाइं तर्फे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.आपल्य लाडक्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी मुंबईतील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 वर बुधवार दि .11 जून रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या