चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर – समाजातील संकटग्रस्तांना धीर देणाऱ्या हातांपैकी एक असलेली ‘ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी’ ही संस्था पुन्हा एकदा समाजसेवेच्या अग्रेसर कार्यामुळे चर्चेत आली आहे. बार्शी शहरातील डिजिटल मीडियातील पत्रकार हर्षद लोहार यांच्यावर अलीकडेच गंभीर आजारामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यांच्या उपचारासाठी भगवंत हॉस्पिटल, बार्शी येथे दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च मोठा असल्यामुळे शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
ही बाब ओळखून ‘ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थे’ चे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील शिक्षक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराने आपापल्या परीने मदत गोळा केली. जमा झालेली ₹२०,०००/- (वीस हजार रुपये) रक्कम डॉ. पडवळ हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरला चेकद्वारे देण्यात आली.
या वेळी राहुल वाणी, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, अजय तिवारी, सुनील फल्ले, प्रा. चंद्रकांत उलभगत, गणेश कदम, सुरेंद्र स्वामी, सुनील नवले, रेखा विधाते, रागिनी झेंडे, पत्रकार राजश्री गवळी, सुजाता अंधारे, रेखा सरवदे तसेच हर्षदचे मित्र प्रवीण परदेशी व केदार शेटे उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे सदस्य प्रा. चंद्रकांत उलभगत यांनी सर्वांच्या वतीने "हर्षद लोहार लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत" अशी भावनिक साद श्री भगवंत चरणी अर्पण केली.
या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे व सहभागी सदस्यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मानले असून, समाजातील अशा सकारात्मक कार्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
0 टिप्पण्या